आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:येवल्यात शनी पटांगणावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शनि पटांगणसह मुख्य रस्त्यावरील दररोज बसणाऱ्या भाजीपाला, फळे व इतर विक्रेत्यांचे अतिक्रमण पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवले. पालिकेने भाजीपाला व फळे विक्रेत्यांसाठी बाजारतळात व्यवस्था केली असून विक्रेते या ठिकाणी बसत नव्हते.

शनी पटांगणावर भाजीपाला व फळे विक्रेते विक्रीसाठी दररोज बसत असल्याने येथील मुख्य रस्त्यावर रहदारीला अडचण निर्माण होत होती. यामुळे पालिकेने इंद्रनील कॉर्नरसमोर भाजीपाला विक्रेत्यांसाठी दोन तीन वर्षांपूर्वी सुसज्ज बाजारतळ बांधून दिले होते. मात्र याठिकाणी भाजीपाला, फळे विक्रेते व फेरीवाले बसत नव्हते. शहरातील मेन रोड व शनि पटांगण भागात यामुळे मोठी गर्दी होऊन वाहनांना गावात प्रवेश करताना अडचण होत होती. पालिकेने वारंवार विक्रेत्यांना तोंडी सूचना देऊनही भाजीपाला विक्रेते व फेरीवाले बाजार तळावर बसत नव्हते. पालिकेने विक्रेत्याना गुरुवारी सूचना देऊन शुक्रवारी सकाळी अतिक्रमण मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान मेन रोड येथील भाजीपाला विक्रेते फेरीवाले यांची अतिक्रमणे काढून त्यांना बाजार तळावर बसण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या. त्यानुसार मेन रोड व शनी पटांगण येथील भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार तळावर स्थलांतर केल्यामुळे मोकळा श्वास घेतल्याचा चित्र पाहायला मिळाले. या मोहिमेत पालिकेचे नगर रचनाकार कौस्तुभ भावे, कर निरीक्षक आदित्य मुरकुटे, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, कर निरीक्षक गोविंद गवांदे, विद्युत अभियंता अशोक कटारे, शिवशंकर सदावर्ते, तुषार लोणारी, अग्निशमन विभाग व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...