आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम:‘काैशल्य विकास’तर्फे 100 जणांना नवउद्योजकतेचे प्रशिक्षण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सह्याद्री फॉर्म्स येथे दहा दिवसांचे मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील आदिवासी दुर्बल घटक आणि शेतकरी युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे. या प्रशिक्षणात नवीन उद्योग उभारणी, मार्केटिंग, बिझनेस प्लॅन तयार करणे, कर्जप्रकरणासाठी सहाय्य इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणामार्फत जिल्ह्यातील आदिवासी दुर्बल आणि शेतकरी कुटुंबातील १०० उमेदवारांना यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत संकल्प प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सह्याद्री फॉर्म्स ८६९८४११२८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...