आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाचे विसर्जन:पर्यावरणरक्षण; पाताळेश्वरच्या इको फ्रेंडली गणेशाचे विसर्जन

सिन्नर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणपती मूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. इको फ्रेंडली बाप्पाच्या विसर्जनाचा हा आगळावेगळा सोहळा विद्यार्थ्यांनी डोळ्यात साठवला.

गणेशाेत्सवानिमित्त विद्यालयात वक्तृत्व, निबंध, रांगोळी, गणेश आरास, चित्रकला, मंत्र व श्लोक पाठांतर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाचा आविष्कार घडवून आणला.‌ याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व, लेक वाचवा, लेक शिकवा, आरोग्याची काळजी यावर नाटिका सादर करून लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेशाेत्सव खऱ्या अर्थाने साकार केला. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक बाबी जोपासण्याची शपथ दिली.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गणेशमूर्तीचे विसर्जन घरगुती टपमध्ये करून ते पाणी झाडांना घाला. निर्माल्य पाण्यात न टाकता झाडाच्या बुंध्याशी ठेवून त्याचे खत तयार करा, पाण्याचे प्रदूषण टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.‌ कलाशिक्षक के. डी. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बनविलेल्या १५० मूर्ती गावातील दुकानदार पतसंस्था, पालक यांनी विकत घेतल्या आहेत, त्याचेही विसर्जन पर्यावरणपूरक करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम.‌ शेख, सविता देशमुख, टी.‌ के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...