आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमाची स्थापना:उद्योजकांच्या समस्या निरसनसाठी सिमाची स्थापना

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, विकासाच्या व पायाभूत समस्यांचे तत्काळ निरसन होण्यासाठी येथील उद्योजकांनी एकत्रित येत सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) ची स्थापना केली. बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी किशोर राठी, उपाध्यक्षपदी किरण भंडारी, सचिवपदी बबन वाजे, कोषाध्यक्षपदी राहुल नवले, सहसचिवपदी दत्ता ढोबळे, सहकोषाध्यक्षपदी रतन पडवळ यांची तर संचालकपदी किरण बडगुजर, हेमंत नाईक, लक्ष्मण डोळे, अजिंक्य पाध्ये, अनिल कदम, सुधीर जोशी, विनायक बेडीस, मुकेश देशमुख, रोमित पटेल, निलेश काकड, नारायण क्षीरसागर, शांताराम दारुंटे यांच्या निवडी करण्यात आल्या. विश्वस्त मंडळावर मारुती कुलकर्णी, अरुण चव्हाणके, एस. के. नायर, किरण वाजे, कृष्णा नाईकवाडी, अतुल अग्रवाल यांचा समावेश आहे. यावेळी किरण वाघ, जयवंत काळे, नवनाथ नागरे, ज्ञानेश्वर भागवत, बाबासाहेब हारदे, मिलिंद इंगळे, भूषण क्षत्रिय आदी उद्योजक उपस्थित होते.

यामुळे स्थापनेस मिळाली चालना उद्योजकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी स्थानिक औद्योगिक संघटना असणे गरजेचे असल्याचे उद्योजक अरुण चव्हाणके यांनी निदर्शनास आणले. स्थानिक औद्योगिक संघटनेमुळे वसाहतीतील उद्योजकांचे प्रश्न व विकासात्मक कामाच्या दृष्टीने अधिकारी व लोकप्रतिनिधींशी तत्काळ संपर्क साधणे सोपे होणार असल्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजक एकत्र आले. त्यांनी ‘सिमा’ स्थापनेचा निर्णय घेतला. चव्हाणके हे विश्वस्त म्हणून भूमिका बजावणार आहे.

दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत प्रश्न माळेगाव व मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील अनेक समस्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. मूलभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. रस्ते, पाणी, गटारी, पथदीप यांसह ट्रक टर्मिनससारखे प्रश्न सुटलेले नाहीत. संघटन नसल्यामुळे प्रशासन दाद देण्यास टाळाटाळ करत असल्याचा अनुभव उद्योजकांना आला. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी येथील उद्योजक एकत्र आले आहेत. मुसळगाव व माळेगाव उद्योजकांच्या विकासाच्या दृष्टीने व पायाभूत समस्यांसाठी वरील पदाधिकारी व सभासद हे आपली जबाबदारी म्हणून सहकार्य करणार आहेत. संस्थेचे सभासदत्व घेऊन आपली जबाबदारी अधोरेखित करण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...