आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आरोग्य शिबिरात 400 रुग्णांची तपासणी व औषधोपचार; रोटरी क्लब ऑफ मालेगावकडून डांगसौदाणेत उपक्रम

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ मालेगावतर्फे डांगसौंदाणे परिसरातील आदिवासी बांधवांसाठी नुकतेच सर्वरोग निदान शिबिर घेतले. यात ४०० रुग्णांची तपासणी केली.

गेली बारा वर्षे रोटरी क्लबच्या वतीने कसमादे पट्ट्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्यासाठी प्रतिवर्षी अशा शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षीच्या शिबिरात डॉ. तुषार झांबरे, डॉ. ज्ञानेश्वर अहिरे, डॉ. गौरव काकाणी, डॉ. राहुल बाफना, डॉ. दर्शन ठाकरे, डॉ. आफताब बिलाल, डॉ. शकील अहमद, डॉ. ओंकार जाधव, डॉ. दिलीप जैन, डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ. सचिन बोरसे, डॉ. गौरव बेंडाळे, डॉ. शकील सय्यद, डॉ. रिटा मर्चंट, डॉ. निमा सूर्यवंशी, डॉ. अलका भावसार, डॉ. अमेया बेंडाळे आदी डॉक्टरांनी नि:शुल्क सेवा देऊन रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात बालरोग, दंतरोग, त्वचारोग, अस्थिरोग, स्त्रीरोग व सर्वसाधारण सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

शिवाय रुग्णांना सर्वप्रकारची औषधे मोफत वाटण्यात आली. या शिबिरासोबतच मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या टीमच्या सहकार्याने आदिवासी महिलांची कॅन्सर तपासणीही करण्यात आली. यासोबतच सध्या मधुमेह रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अशा रुग्णांसाठी मधुमेह तपासणी करून रुग्णास मधुमेह आहे किंवा नाही याविषयीची जागृती करण्याचे कार्यही या शिबिरामार्फत करण्यात आल्याची माहिती क्लबचे सदस्य प्रा. प्रशांत पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...