आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा रोटरी क्लब ऑफ मालेगावतर्फे कळवण तालुक्यातील दळवट येथे ३० आदिवासी पाड्यांवरील रुग्णांसाठी मोफत सर्वरोगनिदान शिबिर झाले. या शिबिरात नऊशे रूग्णांची तपासणी झाली. तर सातशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली. दळवट येथील शिबिरात विविध आजारांकरिता तपासणी करण्यात येऊन उपचारांसह मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. परिसरातील जवळपास ३० पाडयांवरील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. रोटरी आय हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञांकडून या शिबिरासाठी येणाऱ्या प्रत्येक रूग्णाची डोळे तपासणी करण्यात आली.
१८ नेत्ररुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन नंतर त्यांना त्यांचे गावी रोटरी वाहनाने पाठविण्यात आले. शिबिरासाठी डॉ. दत्ता पाटील, डॉ. व्यंकटेश झवर, डॉ.महेश तेलरांधे, डॉ. अनिल मर्चंट, डॉ. रिता मर्चंट, डॉ. ज्ञानेश्वर अहिरे, डॉ. विकास देसले, डॉ.शकिला सय्यद, डॉ. दिपक सूर्यवंशी, डॉ. प्रभाकर शिरसाठ, डॉ. विनायक निकम, डॉ. प्रल्हाद सूर्यवंशी, डॉ. सुकदेव ठाकूर डॉ. केशव खैरनार, डॉ. सचिन बोरसे, डॉ. दलविर राजपूत आदी डॉक्टरांनी सेवा दिली. आबा बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
रोटरीचे अध्यक्ष डॉ. संजय बेंडाळे, सचिव प्रा. प्रशांत पाटील, मेडिकल संचालक डॉ. शकिल अल्ताफ, प्रकल्प प्रमुख डॉ. विकास देसले, अनिल शिंदे यांनी पुढाकार घेतला. संजय भालेकर यांनी औषध वितरण केले. शिबिरात पाड्यांवरील एकूण ९०० महिला, पुरुष व बालके यांच्यासह आश्रम शाळेतील ७०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी विजय पोफळे, अॅङ विजय कुलकर्णी, दिनेश जाधव, दिलीप सन्याशिव, भरत तापडे, डॉ. विनोद गोरवाडकर,राकेश डिडवाणीया, देवेंद्र शाह, संजय तुखिया, नीरज खंडेलवाल, सचिन पवार, सनी पोरवाल, अभिजित चिंधडे, शशी पवार, राहुल खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.