आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ; पिंपळगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप पवार

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप पवार यांची तर उपाध्यक्षपदी ललिता पवार यांची अविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी मंगळवारी नवनिर्वाचित सदस्यांची सकाळी ११ वाजत सोसायटी कार्यालयात बैठक झाली. नियोजित वेळेत अध्यक्ष - उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी शेळके यांनी संदीप पवार व ललिता पवार यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी डॉ. जयंत पवार, सुरेश पवार, पुंजाराम पवार, बबन पवार, शांताराम पवार, बापू पवार, बाबुराव पवार, अनिल पवार, सयाजी पवार, देवीदास पवार, प्रभाकर पवार, महेंद्र पवार, देवबा सोनवणे, केदा पवार, केशव पवार, दौलत पवार, विष्णू पवार, सचिन शिंदे, प्रवीण पवार, अतुल पवार, किरण पवार, अनुज पवार, बाळकृष्ण पवार, सतीश पवार, गिरीश पवार, अशोक पवार, भूषण पवार, सुनील पवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...