आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक‎:साडेतीन शक्तिपीठांसह नारीशक्ती‎ चित्ररथाचे उद्या वणी येथे प्रदर्शन‎

नाशिक‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक‎ दिनानिमित्त कर्तव्यपथावर‎ झालेल्या संचलन सोहळ्यात‎ महाराष्ट्रातील साडेतीन‎ शक्तिपीठांसह नारीशक्ती या‎ चित्ररथाने सर्व उपस्थितांची आणि‎ हा सोहळा दूरवर पाहणाऱ्या‎ जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत‎ सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय‎ क्रमांक प्राप्त केला. या चित्ररथाचे‎ महाराष्ट्रात सर्व स्तरातून कौतुक‎ होत आहे.

साडेतीन शक्तिपीठांवर‎ आधारित चित्ररथाचे प्रदर्शन‎ सप्तशंृगी मंदिर, वणी येथे होणार‎ असून या चित्ररथाचा सांस्कृतिक‎ कार्यक्रम गुरुवारी (दि. १६)‎ सकाळी ११ वाजता श्री सप्तशंृगी‎ मंदिर, वणी, येथे होणार आहे.‎ भाविकांनी या चित्ररथाच्या‎ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे‎ आवाहन राज्याचे सांस्कृतिक‎ कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी‎ केले आहे. चित्ररथात‎ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे‎ दर्शनदेखील घडणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...