आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:मालेगाव वन क्षेत्रामध्ये १ जुलैपासूनमोहीम; 120 हे.वर होणार 1.92 लाख वृक्ष लागवड

मालेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १ जुलैपासून वृक्षरोपे लागवडमोहीम सुरू होत आहे. यामोहिमेंतर्गत मालेगाव वनक्षेत्रात १२० हेक्टरवर विविध प्रजातींच्या एक लाख ९२ हजार वृक्षरोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मालेगाव, वनपट व हाताणे येथील नर्सरींमध्येरोपे तयार झाली आहेत. संपूर्ण जुलै महिन्यातमोहीम राबवून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केली जाणार आहे.

या वृक्षरोपांची होईल लागवड
कमी पर्जन्यात वाढणाऱ्या वृक्षरोपांची लागवड होणार आहे. यात प्रामुख्याने कडुनिंब, सिसव, करंज, आवळा, खैर, वावळा, चिंच आदीरोपांचा समावेश आहे. वृक्ष लागवडीत पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. संस्थांना मागणीप्रमाणे ८ ते १० रुपयाच्या शासकीय दरानुसार वृक्षरोप उपलब्ध करून दिले जाईल.

संवर्धनावर लक्ष
बियाणांचेरोपण करून नर्सरींमध्ये वृक्षरोपे तयार केली आहेत. लागवड होणाऱ्या वृक्षरोपांचे जतन करण्यावर विशेष लक्ष देणार आहोत. तीन वर्षापूर्वी सुमारे अडीच लाख वृक्षरोपांची लागवड झाली होती. यातील बऱ्याचरोपांचे आज वृक्षात रुपांतर झाले आहे.
- वैभव हिरे, वन परिक्षेत्र अधिकारी, मालेगाव विभाग.

बातम्या आणखी आहेत...