आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:डिप्लोमा फार्मसीच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे राज्यातील डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती येथील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी व प्राचार्य संजय जैन यांनी दिली. डी. फार्मसी अभ्यासक्रम व बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अंतिम दिनांकामध्ये समानता राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा अंतिम दिनांक १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी डी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या श्री दीपचंद फ. लोढा फार्मसी व श्रीमान सुरेशदादा जैन पदविका फार्मसी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त, प्रबंध समिती व प्राचार्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...