आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 20 पर्यंत मुदतवाढ

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी अर्ज भरण्यास २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह २१ ते २५ डिसेंबर तर अतिविलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. यानंतर कुठल्याही परिस्थितीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपयुक्त संजयकुमार राठोड यांनी काढले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ही १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी परीक्षा परिषदेच्या. www.mscepune.in व www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच संकेतस्थळावर जाऊन इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज ऑनलाईन भरू शकतात.

सदर परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तथापि, शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरणे करता अंशतः बदल करून दि. २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाइन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी २० डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्धी निवेदनातून दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...