आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिळवणूक:मालेगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक

मालेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मका लिलावाच्या अनिश्चित व मनमानी वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, अशी तक्रार भाजप तालुका संघटन सरचिटणीस उमाकांत कदम यांनी जिल्हा निबंधक यांच्याकडे केली आहे. मका उत्पादक शेतकरी हे एक दिवस अगोदर रात्री बाजारात मका विक्रीसाठी दाखल होतात.

सकाळी व्यापारी व प्रशासन हे सकाळी ११ वाजता लिलाव सुरू करतात, दुपारी १ वाजता बंद करतात. सायंकाळी त्यांच्या मर्जीनुसार ४ ते ४.३० वाजता लिलाव सुरू करतात. कारण विचारले असता व्यापारी व कर्मचारी यांच्या जेवणाची वेळ असते, अशी उत्तरे मिळतात. मात्र हालअपेष्टा शेतकऱ्यांना भोगाव्या लागतात. याला कुणाचा अंकुश नाही, व्यापाऱ्यांवर कोणतेही निर्बंध नाहीत. रात्री उशिरापर्यंत लिलाव चालतो, पैसे रात्री किंवा दुसऱ्या दिवशी मिळतात. याकडे कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांचे लक्ष वेधले आहे.

बातम्या आणखी आहेत...