आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:बळजबरी वर्गणी वसुली केल्यास खंडणीचा गुन्हा नाेंदवणार : खांडवी

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या दाेन दिवसांवर गणेशाेत्सव येऊन ठेपल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. बरीच मंडळे पावती पुस्तकांद्वारे वर्गणी जमा करून आरास व इतर उपक्रम राबवितात. वर्गणी जमा करताना बळजबरी किंवा दमबाजीचे प्रकार घडतात. अशा पद्धतीने बेकायदा वर्गणी वसुली करणाऱ्यांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिला आहे.

दाेन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशाेत्सव साजरा हाेत आहे. गणेशभक्तांचा उत्साह पाहता यंदा माेठ्या प्रमाणावर लहान व माेठ्या सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची स्थापना हाेण्याची शक्यता आहे. काही गणेश मंडळे नागरिकांकडून वर्गणी स्वरुपात पैसे जमा करतात.

घराेघर किंवा दुकानांवर जाऊन वर्गणीची मागणी करत असतात. बऱ्याचदा दुकानदार,व्यावसायिकांकडून सक्तीने वर्गणी वसुली करण्याचे प्रकार घडतात. वर्गणीसाठी दबाव टाकला जाताे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याचा धाेका आहे. त्यामुळे पाेलिसांनी खबरदारी घेत सक्तीने किंवा बळजबरीने वर्गणी वसुली करू नये अशा सूचना मंडळांना केल्या आहेत. यासंदर्भात तक्रारी आल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...