आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

री-घरफोडी:तिसऱ्याही दिवशी चोरीचा अयशस्वी प्रयत्न

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात दहा ते बारा दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांकडून दररोज चोरी-घरफोडीचे प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी (दि.३) चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्यावर चोरीचा प्रयत्न केला अन्‌ तोही रात्री ९ वाजता, मात्र यावेळी वर्दळ असल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न अंगलट आल्याने त्यांनी डोंगराच्या दिशेने पोबारा केला.

दरम्यान, या गदारोळात चिंचोली येथून मित्राला सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाला ग्रामस्थांनी चोर समजून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे समजते.दहा-बारा दिवसांपूर्वी एका रात्रीच दोन ठिकाणी दरोडा टाकला होता, त्यानंतर एक-दोन दिवसाआड या परिसरात दरोड्यांचे सत्रच सुरू झाले. बुधवारी (२) मध्यरात्री १.४० च्या सुमारास गावानजीक इंद्रायणी लॉन्सच्या पाठीमागील बाजूस शिवाजी पांडुरंग आव्हाड यांच्या बंगल्यात चार ते पाच जणांनी चोरीच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केला.

मात्र कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने तो अयशस्वी ठरला, त्यानंतर गुरुवारी रात्री सेवानिवृत्त पोलिस अधिकारी नारायण शेळके यांच्या बंगल्यात‌ चोरीच्या प्रयत्नात असतानाच ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने आरडाओरडा केल्याने चोरटे डोंगराच्या दिशेने पसार झाले. या दरम्यान, मित्राला गावात सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाला चोरटा समजून ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली.‌

बातम्या आणखी आहेत...