आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:कांद्याच्या घसरत्या दराने नामपूरला शेतकऱ्यांचा दाेन तास रास्ता रोको

नामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याच्या घसरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे घसरत्या भावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांनी नामपूर बाजार समितीसमोर नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको केला. यावेळी आगामी विधानसभा व लाेकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ठराव करण्याबराेबरच लाेकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरू न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. कांदा उत्पादक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन करण्यात आले. त्यानंतर मंडल अधिकारी व पाेलिस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महिनाभरापासून कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने उत्पादन खर्च काढणेही अवघड झाले आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा निर्यातीचे योग्य असे समीकरण नसल्याने व नाफेडमार्फत कांदा खरेदी बंद असल्याने चाळीत साठवलेला कांदाही खराब हाेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. अशा अनेक प्रश्नांसंदर्भात शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नामपूर येथे सकाळी दहा वाजता रास्ता राेकाे करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे दाेन तास झालेल्या रास्ता राेकाेमुळे वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत नेते शरद जोशी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. आंदोलनादरम्यान बागलाण तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, कार्यध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, जितेंद्र सूर्यवंशी, कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, मधुकर कापडणीस, सुभाष शिंदे, गणू अहिरे, बिपिन सावंत, किरण अहिरे, प्रवीण अहिरे, प्रवीण सावंत, विनोद पाटील, हितेंद्र कापडणीस, संदीप कापडणीस, दिनेश कापडणीस, राहुल पगार, कोमल पगार, सचिन पगार, जितेंद्र कापडणीस, संजय पगार, सतीश कापडणीस आदी उपस्थित होते. त्यानंतर मंडल अधिकारी उमेश गायकवाड, जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक तुषार भदाणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बाजार समितीत सुविधा देण्याची मागणी
आंदाेलनादरम्यान कांदा प्रश्न, बाजार समितीच्या उपायोजनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यात बाजार समितीत शेतकरी निवारा शेड, पेव्हर ब्लॉक, कोल्ड स्टोरेज, बाजार समितीत येण्यासाठी योग्य रस्त्याची सुविधा आदी प्रश्न उपस्थित केले.

बातम्या आणखी आहेत...