आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाझर तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात गर्दी:कुसूरला शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

येवला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुसुर येथे पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान शेतकरी मधुकर उत्तम गायकवाड (३५) हे गावालगत असलेल्या पाझरतलावात बैल धुण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. बैल धुण्यासाठी गेलेले मधुकर खूप वेळ होऊनही बाहेर न आल्याची शंका येताच त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ही घटना समजताच पाझर तलावाच्या काठावर गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. २ ते ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...