आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शेतकरीच जगाचा खरा पोशिंदा ; कळवण येथे सुंदर बैलजोडी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

कळवणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरीच या जगाचा खरा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल. यामुळे शेतकऱ्यांचा राजासारखा आदर करा, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा फार्मर्स असोसिएशनचे संस्थापक उद्योजक मनीष बोरा यांनी केले. यावेळी ग्रुपच्या वतीने सप्तशृंगी वृद्धाश्रमास व शिवस्मारकास प्रत्येकी अकरा हजारांची देणगी तर बैलजोडी गमावलेल्या निवाणे येथील शेतकरी दिलीप आहेर यांस सहा हजारांची मदत दिली.

येथील आप्पाश्री लाॅन्स येथे आयोजित, सुंदर बैलजोडी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वणी कृउबा समितीचे सचिव मुक्तार शहा, सुभाष देशमुख, खंडेराव निकम आदी उपस्थित होते. बोरा यांनी फार्मर्स असोसिएशनचा उद्देश स्पष्ट करताना शेतकऱ्यांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने अतुल देवरे, श्रीधर वाघ, मयुर देवरे, आबा नितानेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर उत्कृष्ट सजावट करणाऱ्या विजेत्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांनाही सन्मानचिन्ह देण्यात आले. सूत्रसंचालन राकेश हिरे तर आभार संदीप शिरसाठ यांनी मानले. यावेळी दुष्यंत पवार, हितेंद्र पगार, मिथुन शिंदे आदींसह नाशिक फार्मर्स असोसिएशनचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...