आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा इशारा

चांदवड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य किसान सभेची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत तीन जिल्ह्यातील किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. हिरालाल परदेशी होते. तर बैठकीस किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. बन्सी सातपुते उपस्थित होते. बैठकीत हमी भावाचा कायदा करण्यासाठी लढा उभारण्याबाबत तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भाने दि. २६ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला अनुसरून विधानभवनावर दहा हजार कार्यकर्त्यांचा मोर्चा नेण्यासंदर्भाने चर्चा करण्यात आली.

ओला दुष्काळ, नुकसान होऊनही शेतकऱ्यांना न मिळालेली पीकविम्याची नुकसानभरपाई याबाबत चर्चा करण्यात आली. दि. २६ नोव्हेंबरला संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असली तरी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला म्हणून निषेध दिन पाळण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...