आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान किसान योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. अशा लाभार्थींना या योजनेतून मिळालेल्या लाभाची रक्कम शासन जमा करण्याची नोटीस संबंधीत तलाठी यांच्यामार्फत बजावण्यात आली असून संबंधितांनी या रकमेचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे. सदर रकमेचा भरणा न केल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार यांनी पत्रकानव्ये दिला आहे.
तालुक्यात प्रधानमंत्री किसान योजनेसाठी अपात्र असतानाही संबंधित शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती चुकीची भरल्यामुळे शासनाने आयकर भरणाऱ्या ७०६ लाभार्थी व अन्य इतर कारणांनी अपात्र ठरलेल्या अशा एकूण ५७७ लाभार्थींना अपात्र ठरवले आहे. सर्व अपात्र लाभार्थींना तहसील कार्यालयामार्फत नोटिसा देण्यात आल्या आहे. इन्कमटॅक्स भरणारे ७०६ अपात्र खातेदारापैकी ४४२ व इतर कारणांनी अपात्र ठरलेल्या ५७७ पैकी ७४ लाभार्थींनी शासनास रक्कम परत केली आहे. सर्व अपात्र लाभार्थींनी सदर रकमेचा भरणा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे.
रक्कम न भरल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्याची कार्यवाही केली जाईल अपात्र लाभार्थींची यादी तालुक्यातील सर्व संबंधित तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी आपल्याकडे प्रलंबित असलेली योजनाची रक्कम शासनास भरणा करून सहकार्य करावे, अन्यथा पुढील सात दिवसांत सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे. --------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.