आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथकीत वीजबिलापोटी शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणने त्वरित थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संपतबाबा वक्ते, जिल्हा उपाध्यक्ष रमेश सदगीर, गोविंद गांगुर्डे, दिगंबर गांगुर्डे, चांदवड तालुकाध्यक्ष संजय गुंजाळ, शरद पगार, नागेश ठोंबरे, लक्ष्मण गायकवाड, दत्तात्रेय वाढवणे, ज्ञानेश्वर चौधरी, रंगनाथ शेळके आदींनी निवेदन सादर केले. परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला असताना रब्बी हंगामाच्या प्रारंभी महावितरणने थकीत वीजबिलापोटी शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वीजबिले भरूनही रोहित्र मिळण्यास पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ लागतो. शेतकऱ्याने कृषिपंपासाठीचे कोटेशन भरल्यानंतर वीज कंपनीने एक महिन्याच्या आत वीजजोडणी करून दिली पाहिजे, मात्र लाखो शेतकरी यापासून वंचित आहेत. महावितरणने कायद्यानुसार शेतकऱ्यांना प्रति आठवडा शंभर रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.