आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालेगावची उत्पादने तसेच कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शहरात शुक्रवारपासून (दि. ३) मालेगाव महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख उपस्थित राहणार असून स्थानिक व राज्यातील नेते तसेच मान्यवरांना निमंत्रित केले आहे,अशी माहिती महोत्सवाचे आयोजक तथा आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेड इन मालेगाव फेस्टिव्हलच्या प्रवेश, निर्गमन, पार्किंगसह संपूर्ण नियोजनाची महिती शेख यांनी दिली. ते म्हणाले, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून महोत्सवाला प्रारंभ होईल.
हा महोत्सव अराजकीय पद्धतीने आयोजित केला जात आहे. या महोत्सवात मालेगाव शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, मदरशातील विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण व कौशल्य प्रकट करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. विविध सांस्कृतिक सादरीकरणासाठी २१०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. महोत्सवात मालेगावातील जनतेने विशेषतः महिलांनी सहभागी व्हावे,असे आवाहन शेख यांनी केले. मिनारा हॉटेलसमोरील मैदानात पार्किंगसाठी युनिव्हर्सल सायझिंगजवळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूरचे माजी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांना दि.८ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे आमंत्रित केले आहे. सुरक्षा व्यवस्था: महोत्सवात २५ सुरक्षारक्षक , २०० स्वयंसेवक तसेच संपूर्ण महोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या जवानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
२०५ स्टॉल्स, ३०० लोकांच्या भोजनासाठी राउंड टेबल
महोत्सवात सेल झोनमध्ये १३७ आणि फूड झोनमध्ये ६८ स्टॉल्स उभारले जात आहेत, अशा प्रकारे २०५ स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. प्रसिद्ध हॉटेल्सचे टेबल्स लावले जात आहेत. एकाच वेळी ३०० लोकांसाठी राउंड टेबलवर जेवणाची व्यवस्था केली जात आहे. पाच हजार खुर्च्या असलेल्या सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.महिलांसाठी स्वतंत्र मार्ग आहेत. स्पर्धेत ७० शाळा व १५ मदरशातील २००० विद्यार्थी सहभागी होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.