आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रचना:अंतिम प्रभागरचना गुरुवारी ; मनमाड नगरपालिकेच्या 16 प्रभागांची अंतिम रचना जाहीर

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेची अंतिम प्रभागरचना गुरुवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान, नव्या प्रभागरचनेनुसार शहराचे आता द्विसदस्यीय पद्धतीचे एकूण सोळा प्रभाग झाले आहे. व एकूण ३३ नगरसेवक राहणार आहेत. प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या हालचालीही आता सुरू झाल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली त्यांच्या आदेशानुसार मनमाड नगरपालिका प्रशासनाने ही प्रभागरचना गुरुवारी प्रसिद्ध केली असून नगरपरिषदेच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध झाली आहे.

१८ नागरिकांनी या प्रभागरचनेवर हरकती घेतल्या होत्या. यामध्ये काही प्रभागांची झालेली तोडफोड, अनेक भाग दुसऱ्या प्रभागात समाविष्ट होणे असे तक्रारीचे स्वरूप होते. या हरकती व सुनावणी झाल्यानंतर किरकोळ दुरुस्त्यांनंतर अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. यानुसार या प्रभागरचनेला मंजुरी मिळाल्यानंतर नगरपालिकेची अंतिम प्रभागरचना नोटीस बोर्डवर लावण्यात आली. प्रभागरचना करताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचे १६ प्रभाग झाले आहेत. त्यातील शेवटच्या १६ व्या प्रभागात तीन सदस्य असे एकूण ३३ सदस्य राहतील.

बातम्या आणखी आहेत...