आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मनमाड पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, आज आरक्षण सोडत

मनमाड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेच्या १ ते १६ प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता ओबीसी आरक्षणाचा विचार न करता सोमवारी (दि. १३) रोजी अनुसूचित जाती-जमाती, महिला प्रभागांची आरक्षण सोडत पालिका सभागृहात काढली जाणार आहे.

नगरपालिका मतदानाची प्रभानिहाय प्रारूप मतदार यादी २१ जूनला प्रसिद्ध होणार असून त्यावर २७ जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल होतील. अंतिम प्रभागनिहाय याद्या अधिप्रमाणित करून त्या १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय याद्या ५ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणुका या ऑगस्ट-सप्टेंबर मध्येही होऊ शकतात. कारण ज्या भागात पाऊस कमी आहे तेथे लवकर निवडणुका घेण्यास अडचण नाही, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. सोमवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष व इच्छुकांचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्या वॉर्डामध्ये महिलांसाठी राखीव आरक्षण मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यानंतर १५ ते २३ जूनपर्यंत या आरक्षणावर हरकती सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मांडता येतील, त्यानंतर विभागीय आयुक्त २४ जूनला आपला अहवाल सादर करतील आणि एक जुलैला प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

शहरातील १६ प्रभागातून ३३ नगरसेवक नगरपालिकेत पोहोचतील नवीन प्रभागरचना जाहीर झाली असून ही प्रभागरचना पाहून निवडणुकीसाठी गेली २ वर्ष वाट पाहत असलेल्या इच्छुकांत कही खुशी कही गम दिसून आले. सोमवारी जाहीर होणाऱ्या राजकीय आरक्षणानंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार आहे. दरम्यान प्रारुप प्रभाग रचनेनुसार अनेकांनी चाचपणी आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

येवल्या पालिकेसाठीही आज सोडत
नगरपालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून सोमवारी (दि. १३) आरक्षण जाहीर होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. यात प्रभाग क्रमांक ५, ७, ९, १०, १२ व १३ संदर्भात सात हरकती प्राप्त झाल्या होत्या. या पैकी सहा हरकती सुनावणी दरम्यान फेटाळण्यात आल्या. विष्णू पांडुरंग कऱ्हेकर यांची हरकत सूचना स्वीकारण्यात येऊन दुरुस्ती केली गेली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी, (दि.९ ) नगरपालिका नोटीस बोर्डावर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली गेली.

बातम्या आणखी आहेत...