आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज बँकिंग क्षेत्रात रोज नवीन आव्हाने समोर येत आहेत. त्यामुळे इतर क्षेत्रांपेक्षा आर्थिक क्षेत्र अधिक जबाबदारीचे आहे. कमको बँकेचे कामकाज समाधानकारक असून जिल्हा बँकेतील ठेवी कमको बँकेला परत मिळण्यासाठी आमदार सत्यजित तांबेंमार्फत मदत करण्याची ग्वाही पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. पदवीधर मतदारांच्या आभार दौऱ्यासाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे कळवण येथे आले असता कमको बँकेला भेट देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला. त्यावेळी डॉ. तांबे यांनी कमको बँकेला मदत करण्याचे आश्वासन देत मार्गदर्शन केले.
यावेळी उपाध्यक्ष दीपक वेढणे यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्या कामकाजाची पद्धत सांगत पंधरा वर्षांच्या कामकाजाला उजाळा देत डॉ. तांबे यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष योगेश महाजन, संचालक प्रविण संचेती, सुभाष शिरोडे, नितीन वालखेडे, विनोद मालपुरे, रंगनाथ देवघरे, सागर शिरोरे, सतीश कोठावदे, लक्ष्मण खैरनार, शालिनी महाजन, भारती कोठावदे आदींसह लहानू धुळगंड, व्यवस्थापक कैलास जाधव, महारू निकम, संभाजी पवार, अभिजित पवार, मनोज घुगे, स्वप्नील अमृतकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.