आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:वीज उपकेंद्र कार्यालयाला आग; किमती केबलचे नुकसान

सिन्नरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फीडरमध्ये बिघाड होऊन वावी येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयास आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. किमती केबलसह विविध इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले. महावितरणचे तांत्रिक पथक नुकसानीची माहिती घेत होते. पावसामुळे पांगरी फीडरवर बिघाड झाल्याने ११ केंद्रही क्षमतेच्या केबलने पेट घेतला.

कार्यालयातील केबल जळाल्या. लगेचच थिणग्या उडू लागल्या. कार्यालयातील जुन्या व वापरात नसलेल्या केबल जळाल्या. खोलीत सगळीकडे आग पसरल्याने धुराचे लोळ निघू लागले. यावेळी ऑइलने पेट घेतल्याने धुराचे लोळ पसरले. कर्मचारी, स्थानिक युवकांनी पाणी ओतून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सहायक अभियंता अजय सावळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पूर्व भागात होणारा वीज पुरवठा बंद केला. कर्मचारी व युवकांनी पाणी वापरून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सिन्नर येथील अग्निशमन पधकाने आग विझवली.