आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळून खाक:शॉर्टसर्किटमुळे आग; सहा वाहने जळून खाक

पिंपळगाव बसवंतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरातील पाचोरे फाट्यावरील साई मोटर्स येथे मंगळवारी (दि. ७) दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा वाहने जळून खाक झाल्याने सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले आहे. पिंपळगाव व एचएएल येथील अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.पाचोरा फाट्यावर गणपत पगार यांच्या साई मोटर्सच्या वर्कशॉपला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.

ही घटना समजताच स्थानिकांच्या मदतीने तातडीने पिंपळगाव बसवंत व एचएएल येथील अग्निशमन यंत्रणेला माहिती देण्यात आली. पिंपळगाव अग्निशमन वाहन निफाडला गेले असल्याने ते काही वेळात दाखल झाले, मात्र एचएएलचे वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने एचएएलसह पिंपळगाव अग्निशमन वाहनाने अर्धा ते पाऊण तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत एक इनोव्हा, एक स्विफ्ट डिझायरसह अन्य चार वाहने जळून खाक झाल्याने सुमारे ८० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...