आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुक:जायखेड्यात  सरपंचासाठी  पाच अर्ज दाखल

जायखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायखेडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरल्याने अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या थेट सरपंच पदासाठी ५ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. वार्ड क्र.३ मध्ये मच्छिंद्र खैरनार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या अविरोध निवडीची आैपचारिकता बाकी आहे. तर ६ वाॅर्डातील उर्वरित १६ जागांसाठी ५४ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सरपंच पदाची स्वप्नं पाहणाऱ्या अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. पर्यायाने उपसरपंचपदास अधिक महत्त्व प्राप्त होणार असून त्यादृष्टीने रणनीती आखली जाणार आहे. सरपंच पदासाठी मीना चेतन अहिरे, बकुबाई देवराम सोनवणे, शोभा निवृत्ती गायकवाड, संगीता संजय गायकवाड, मीराबाई सीताराम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...