आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कठाेर कारवाई सुरू केली आहे. कलेक्टरपट्टा भागातील एका थकबाकीदाराचे पाच गाळे सील करण्यात आले. मनपा हद्दीत भाेगवटादारांना मालमत्ताकर, पाणीपट्टी तसेच घरपट्टीची मागणी देयके पाठविली आहेत. ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांना अंतिम नाेटिसा बजावून तंबी देण्यात आली आहे. नाेटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या व्यक्तींविराेधात कायदेशीर जप्ती कारवाई हाती घेण्यात आली आहे.
थकबाकीदारांवर जप्ती कारवाईसाठी वाॅर्डनिहाय पथकांची स्थापना केली आहे. प्रभाग समिती कार्यालय १ क्षेत्रातील कलेक्टरपट्टा भागात जप्तीची कारवाई करण्यात आली. तिघा थकबाकीदारांचे पाच गाळे सील करून नाेटीस चिकटविण्यात आली आहे. नागरिकांनी थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन प्रशासक भालचंद्र गाेसावी यांनी केले आहे. कारवाईत प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, जप्ती अधिकारी रमाकांत धामणे, जयवंत पाटील, राजेश दिवे, माेहन बागूल, जाेगेंद्र पाथरे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
दंडनीय व्याजात सूट
मिळकतधारकांच्या साेयीसाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी वसुलीसाठी दंडनीय व्याजात सूट देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ३१ जानेवारीपर्यंत दंडनीय व्याजात ७० टक्के सूट देण्यात आली हाेती. आता फेब्रुवारी महिन्यात जे करांचा भरणा करतील त्यांनाही दंडनीय व्याजामध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे. व्याज सूटचा लाभ घेता यावा म्हणून शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही प्रभाग कार्यालयांचे वसुली व कर भरणा कामकाज नियमित वेळेत सुरू राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.