आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दरोड्याच्या तयारीतील पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी

बोरगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा शहराजवळील मोतीबागेजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि. २०) जेरबंद केले होते. मंगळवारी या सर्वांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री आठच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेले संशयित गणेश जगताप (रा. नांदुर्डी, ता. निफाड), दीपक जोरवेकर (रा. संगमनेर), सीताराम उर्फ प्रमोद कोल्हे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), प्रशांत अहिरे (रा. जेलरोड), सोमनाथ भोये (रा. मुळाणे, ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेतले.

गोविंदा लक्ष्मण महाले (रा. सुरगाणा) हा फरार झाला होता. हे सर्व जीप (एमएच १५ ईपी १७४६) व कार (एमएच १७ सीआर ५९८८) या दोन वाहनांत होते. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता पिस्तूल, काडतूस, मिरची पूड, धारदार शस्त्रे, कटर, पाच मोबाइल, दांडके अशी हत्यारे आढळून आली. पाेलिसांनी २९ लाख ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार हा सापळा लावला होता. सहायक पोलिस निरीक्षक शिरोळे, प्रदीप सानप, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलिस निरीक्षक सागर नांद्रे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...