आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपुष्टात:सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात; मालेगाव महापालिकेत सोमवारपासून प्रशासकराज

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यमान महापालिका सभागृह सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून मुदतीत निवडणूक घोषित न झाल्याने राज्य शासनाने पालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त गोसावी यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त गोसावी यांनी सोमवारी (दि. १३) प्रशासकपदाचा पदभार घ्यावा, असे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी दिले आहेत.

एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत ज्या महापालिका तथा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपत आहे, अशा संस्थांची वेळेत निवडणूक घेणे शक्य नसल्याने मुदत संपताच या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मालेगाव महापालिका सदस्यांची मुदतही संपुष्टात येत असल्याने आयुक्त गोसावी यांनी सोमवारी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारावा तसेच तरतुदींनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सेठी यांनी केल्या आहेत.

दुसऱ्यांदा प्रशासक
मालेगाव महापालिकेच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा प्रशासक नियुक्त केला जात आहे. यापूर्वी सन २००१ मध्ये महापालिका निर्मितीनंतर प्रथम तत्कालीक जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हाधिकारी गजभिये सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस पालिकेचे कामकाज पहात असत. यानंतर आयुक्त तथा प्रशासकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती झाली होती. डॉ. कांबळे यांच्या कार्यकाळात पालिकेची पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...