आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोय:नाशिकमधून आता आणखी‎ सात शहरांसाठी विमानसेवा‎ ; अधिकाऱ्यांना सहकार्याचा विश्वास‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडीगाे या देशातील प्रमुख व्यावसायिक‎ विमान कंपनीने नाशिकहून नागपूर, गाेवा‎ आणि अहमदाबादसाठी १५ मार्चपासून‎ विमानसेवा सुरू करण्यात येणार‎ असल्याचे जाहीर केले असून त्याचे‎ तिकिट बुकिंग गुरूवारी रात्रीपासून सुरू‎ झाले आहे. आता आणखी सात‎ शहरांकरिता विमानसेवा सुरू‎ करण्यासाठी इच्छुक असल्याचे‎ इंडिगाेच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमधील‎ प्रमुख २० संघटनांच्या‎ पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत स्पष्ट‎ केले. नाशिककरांकडून सर्वताेपरी‎ सहकार्य करण्याची ग्वाही संघटनांनी‎ अधिकाऱ्यांना दिली.‎ अखेर बहुप्रतिक्षीत इंडिगाेची‎ नाशिकमध्ये एण्ट्री झाली असून तीन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शहरांकरीता प्रत्यक्षात तिकिट बुकिंगही‎ सुरू झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर‎ कंपनीच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी‎ शहरातील निमा, आयमा, तान, निटा, मी‎ नाशिककर, क्रेडाई यांसारख्या प्रमुख २०‎ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत आयमा‎ रिक्रिएशन येथे बैठक झाली.‎ यात इंडिगाे प्रती दिवसी नाशिक‎ विमानतळावर दहा लॅण्डींग आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तितकेच टेक ऑफ करण्याचे नियाेजन‎ करत असल्याचे अधिकाऱ्यांनी‎ सांगितल्याने येत्या काळात, नाशिक‎ देशातील प्रमूख शहरांना विमानसेवेने‎ जाेडले जाणार आहेत.‎

ब्रँडिंग करणार संघटना

इंडिगाे तसेच नाशिकमधून सुरू‎ असलेल्या विमानसेवेचे आपापल्या‎ कार्यालयांबाहेर बॅनर, हाेर्डिंगद्वारे ब्रँडिंग‎ करणार असल्याची माहीती विविध‎ संघटनांनी दिली. विमानसेवेचे दर‎ सुरुवातीच्या काळात २५०० ते ३५००‎ रुपयांदरम्यान ठेवावेत अशी मागणीही पुढे‎ आली. विमानसेवेला उत्तम प्रतिसाद‎ मिळणार असल्याने इतर शहरांकरीता‎ सेवा सुरू करण्यासाठी आत्ताच पाऊल‎ उचलावे अशी मागणी करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...