आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृषी विभाग व यशवंत ग्रामसमृद्धी विकास संस्थेच्या वतीने डुबेरे नाल्यांवर पाच वनराई तयार केले. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. त्याचा परिसरातील जलसाठा वाढीस फायदा होणार आहे.
कृषी सहायक अर्चना भोर, प्रदीप भोर, यशवंत ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वामने यांनी विद्यार्थ्यांना वनराई बंधारे बांधण्याचे प्रात्यक्षिक दिले. प्राचार्य किशोर जाधव यांनी विद्यार्थ्यांना ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या पर्यावरण प्रकल्पाची माहिती दिली. प्रा. रामदास वारुंगसे, प्रा. सुदाम वारुंगसे, प्रा. संदीप पानसरे, प्रा. सोमनाथ माळी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी बांधकाम क्षेत्रातील सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांचा वापर करून त्यात वाळू, माती भरली. त्यापासून वनराई बंधारे तयार केले. अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ढोकी नदी व लेंडी नाल्यावर पाच वनराई बंधारे तयार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडले आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे गरजेचे
दुष्काळजन्य परिस्थिती व त्याची दाहकता डुबेरे व परिसराने अनुभवलेली आहे. त्यामुळे वाहत जाणारे पाणी वेळेत जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मार्गदर्शन प्रवीण वामने यांनी केले. भविष्यातील पाणी संकट परिसरावर येऊ नये, यासाठी आजच वाहणारे पाणी थांबवून ते जमिनीत मुरविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. प्राचार्य जाधव यांनी पाणी अडविले याने विहिरी, कूपनलिका यांची जलपातळी सुधारण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले. अर्चना भोर यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.