आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनीच पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, दीर्घकाळ सेवेत असलेले सर्व कंत्राटी व योजना कामगारांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमीत आस्थापनेवर कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने मंगळवार (दि. १४) पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे यासंदर्भात सिन्नर तालुका शाखेच्या वतीने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तहसीलदार एकनाथ बंगाळे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष परेश जाधव, सरचिटणीस गणेश वाजे, मानद अध्यक्ष धनंजय डावरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मनोहर आव्हाड, शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख खंडेराव आव्हाड, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष अशोक कासार, आदर्श शिक्षक समितीचे राजू सानप, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समितीचे तालुकाध्यक्ष रवींद्र सातव, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे विठ्ठल दौंड आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
आरोग्य विभागास अग्रक्रम देऊन रिक्त पदे तात्काळ भरावीत चतुर्थ श्रेणी व वाहनचालक कर्मचाऱ्यांच्या पदभरती केलेल्या मज्जाव तत्काळ हटवावा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती करताना कोरोनाकाळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विहित वयमर्यादेत सूट द्यावी, शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, जिल्हा परिषदेचे क्षेत्रीय स्थरावरील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना मुख्यालया संदर्भात ग्रामसभा ठरावाची अट शिथिल करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
शासकीय कामकाज होणार प्रभावित
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी तहसील, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक आणि इतर सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने सर्वच कार्यालयातील कारभार प्रभावित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.