आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:सटाणा मर्चंट्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी; समको बँक निवडणुकीत 17 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात

सटाणा, डांगसौदाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बहुचर्चित सटाणा मर्चंट्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७१ पैकी ३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता १७ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणातआहेत. १९ जून रोजी मतदान हाेणारआहे. सत्ताधारी आदर्श व विरोधकांच्या श्री सिद्धिविनायक पॅनलमध्ये दुरंगी लढत रंगणार असून या लढतीकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी (दि. ७) निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन आदर्श पॅनलला गॅस सिलिंडर तर सिद्धिविनायक पॅनल छत्री हे निवडणूक चिंन्ह मिळालेआहे. माघारीनंतर बँकेच्या निवडणुकीसाठी माजी सभापती रमेश देवरे व सटाणा बाजार समितीचे संचालक श्रीधर कोठावदे यांच्या नेतृत्वाखालील आदर्श पॅनल व विरोधकांच्या श्री सिद्धिविनायक पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अंतिम माघारीपर्यंत न थांबता दोन्ही पॅनलने पहिल्या टप्प्यात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून वैयक्तिक गाठीभेटी व हाउस टू हाउस प्रचारावर जोर दिला आहे. एकूणच या निवडणुकीत नेमकी कोणत्या पॅनलची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

पॅनल व त्यांचे उमेदवार...
आदर्श पॅनलचे उमेदवार : सर्वसाधारण गट - मनोज झिप्रू अमृतकार, प्रवीण सुरेश बागड, स्वप्नील भालचंद्र बागड, रमनलाल बुधमल छाजेड, महेश विजय देवरे, अशोक हस्तीमल गुळेचा, सचिन भालचंद्र कोठावदे, अभिजित विश्वासराव सोनवणे, चंद्रकांत बापू सोनवणे, पंकज सुभाष ततार, जयवंत भालचंद्र येवला, कैलास हरी येवला, नागरिकांचा मागास प्रवर्ग - दिलीप श्रीकांत येवला, महिला प्रवर्ग - रूपाली परेश कोठावदे, कल्पना राजेंद्र येवला, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग - प्रकाश हेमचंद सोनग्रा, भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्ग - जगदीश वसंतराव मुंडावरे.

श्री सिद्धिविनायक पॅनलचे उमेदवार : सर्वसाधारण गट - भास्कर केदू अमृतकार, दत्तात्रेय वामन कापुरे, किशोर गोविंद गहिवड, दिलीप दत्तात्रेय चव्हाण, तुकाराम बेणीराम चिंचोरे, प्रकाश दत्तात्रेय जगताप, श्यामकांत निंबा बागड, विजय (बाळू) भिकचंद भांगडिया, विठ्ठल काशीनाथ येवलेकर, यशवंत नारायण येवला, मुकुंद वसंत सोनजे, किशोर आनंदा सोनवणे, इतर मागास प्रवर्ग - मयूर प्रकाश अलई, महिला प्रवर्ग - रूपाली अनिल ततार, रंजनी श्रीकांत येवला, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग - सुरेखा प्रकाश बच्छाव, भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्ग - संजय धनसिंग वाघ.

बातम्या आणखी आहेत...