आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा:माजी आमदार शेख यांनी घेतली भेट

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय धान्य वाटपाच्या अडचणींविषयी माजी आमदार आसिफ शेख यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी वंचित शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली धान्य वितरणाच्या विविध अडचणींसंदर्भात माेर्चा काढण्यात आला हाेता. मुंबईत विराेधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेत निवेदन देण्यात आले हाेते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांशी ऑनलाइन बैठकीतून तक्रारी समजून घेतल्या हाेत्या. याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकला एक बैठक बाेलाविली हाेती. यास उपस्थित राहून शेख यांनी केशरी शिधापत्रिकाधारकांचा धान्यच मिळत नसल्याचे सांगितले. जीर्ण शिधापत्रिका, नावे कमी करणे व नवीन नावांचा समावेश करणे, धान्याची पावती मिळावी आदी विषय मांडले. जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी सध्याचा धान्यसाठा, लाभार्थी संख्या, केशरी कार्डधारकांचे धान्य बंद हाेण्याची कारणे यासंदर्भात माहिती दिली.

धान्यसाठा वाढवून घेण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यासह इतरही अडचणी तातडीने साेडविल्या जातील, असे स्पष्ट केले. आश्वासनानुसार २५ डिसेंबरपर्यंत याेग्य कारवाई करा, अन्यथा २६ डिसेंबरला घेराव आंदाेलन अटळ असल्याचा इशारा शेख यांनी दिला. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...