आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचपद निवडणुक:नागापूरला माजी आमदार पवारांना भावाकडूनच धक्का

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उमेदवार राजेंद्र पवार (९०३) हे थेट सरपंचपदी विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधात असलेल्या राष्ट्रवादीचे अशोक पवार व रघुनाथ सोमासे यांचा पराभव केला. या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार हे स्वतः सरपंचपदाच्या निवडणुकीत होते. त्यांच्या पॅनलविरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे होते. त्यांच्या बाजूने माजी सरपंच अशोक पवार तर तिसऱ्या पॅनलचे रघुनाथ सोमासे हे थेट सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात होते. दोन भाऊ आणि चुलती, पुतणे असे रंगतदार सामने या निवडणुकीत बघायला मिळाल्याने ही निवडणूक चर्चेची ठरली.

बातम्या आणखी आहेत...