आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त:मालेगावी घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या चाैघांना अटक

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरून अवैधधंदा करणाऱ्या चाैघांना आझादनगर पाेलिसांनी अटक केली. त्रिकाेणी गार्डनजवळ शनिवारी दुपारी केलेल्या कारवाइत ७२ सिलिंडर व दाेन रिक्षा असा दाेन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील चाैघांना एक दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली आहे.

वाहनांमध्ये इंधन म्हणून घरगुती सिलिंडरच्या गॅसचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेत आहे. सरदार नगरमधील त्रिकाेणी गार्डनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये हा बेकायदा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक अशाेक रत्नपारखी यांना मिळाली हाेती. त्यांनी पथकाच्या मदतीने छापा टाकला. यावेळी एका प्रवासी रिक्षामध्ये यंत्राच्या सहाय्याने गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी प्रवासी रिक्षा, एक गॅस एजन्सीची रिक्षा व ७२ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत अख्तर काल्यासह मुख्तार अहमद अख्तर अहमद, माेहंमद अतिक अकील अहमद, चेतन सुरेश सकट व राहूल साहेबराव सकट यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अख्तर काल्या वगळता इतर चाैघांना अटक झाली आहे. अधिक तपास पाेलिस उपनिरीक्षक आसिफ शेख करत आहे.

बातम्या आणखी आहेत...