आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाख हस्तगत‎:17 लाखांची राेकड चाेरणाऱ्या चाैघांना अटक‎

मालेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात घरफाेडी करून १७‎ लाख ५९ हजारांची राेकड चाेरुन‎ फरार झालेल्या चाैघांना शहर‎ पाेलिसांनी गुरुवारी अटक केली. या‎ संशयितांच्या ताब्यातून अडीच‎ लाखांची राेकड हस्तगत करण्यात‎ आली आहे. चाैघांना न्यायालयात‎ हजर केले असता ६ फेब्रुवारीपर्यंत‎ पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.‎ इस्लामपरा भागात १६‎ जानेवारीला भरदुपारी माेहम्मद‎‎‎‎‎‎‎‎‎‎ फारुख अब्दुल मजीद यांच्या घरी‎ धाडसी चाेरी झाली हाेती.‎ चाेरट्यांनी जिन्याचे व घराच्या‎ दरवाजाचे कुलूप ताेडून कपाटातून‎ १७ लाख ५९ हजाराची राेख रक्कम‎ लंपास केली हाेती.

अपर पाेलिस‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधीक्षक अनिकेत भारती व‎ सहाय्यक अधीक्षक तेगबीरसिंह संधू‎ यांच्या सूचनेनुसार सहाय्यक‎ निरीक्षक प्रिती सावंजी यांनी तपास‎ केला. चाेरी दरम्यान काही संशयित‎ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले‎ हाेते. या आधारे केलेल्या तपासात‎ संशयित वसीम अहमद जमील‎ अहमद (रा. कमालपुरा) या सराईत‎ गुन्हेगाराची ओळख पटली.‎ पाेलिसांनी वसीमला ताब्यात घेत‎ चाैकशी केली असता त्याने माेहंमद‎ अर्शद निसार अहमद अन्सारी,‎ शहेबाज अहमद अब्रार अहमद,‎ माेहम्मद फारुख अब्दुल मजीद व‎ एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने‎ चाेरी केल्याची कबुली दिली.‎ पाेलिसांनी यांना ताब्यात घेत‎ त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ३००‎ रुपये जप्त केले. उर्वरित रक्कमेच्या‎ अनुषंगाने चाैकशी केली जात आहे.‎

तिसऱ्या धाडसी चाेरीची उकल‎ शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन धाडसी घरफाेड्यांची‎ पाेलिसांनी उकल केली आहे. हारुण अन्सारी उर्दू शाळेतील २० लाखाच्या‎ जबरी चाेरी प्रकरणात सहा जणांना अटक करुन १४ लाखांची राेकड हस्तगत‎ केली हाेती. महेशनगर भागातील सचिन छाजेड या व्यापाऱ्याच्या घरातून १८‎ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल चाेरीस गेला हाेता. यातील तिघा चाेरट्यांना‎ अटक करून पाच लाख रुपये जप्त केले हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...