आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैघांना अटक:पुणे महामार्गावर लुटमार करणाऱ्या चाैघांना अटक

सिन्नर ‌2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे ते संगमनेरदरम्यान तीन ते चार व्यक्तींकडून पिकअप महामार्गावर आडवी लावून वाहनांची लूट केली जात असल्याची माहिती वाहनधारकांनी ११२ क्रमांकावर कळविली होती. याबाबतची सूचना वावी पोलिसांना प्राप्त होताच सहायक निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनेतील संशयितांचा तासाभराच्या आत छडा लावला.‌

ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षिका माधुरी कांगणे, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, सहायक निरीक्षक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय सोनवणे, रामनाथ तांदळकर, शशिकांत उगले, योगेश शिंदे, नितीन जगताप, प्रकाश चव्हाण, भास्कर जाधव यांनी ही कारवाई केली.

कऱ्हे घाटात सफेद रंगाच्या पिकअपसह संशयित संगमनेरच्या दिशेने गेल्याचे समजले. संगमनेरच्या दिशेने शोध घेत असताना पोलिसांना पिकअप दिसून आली. वाहनाजवळ जाताच संशयितांनी जवळच्या डोंगराकडे पळ काढला. दौलत गिते (नांदूरशिंगोटे) याला पोलिसांनी पकडले. त्याची चौकशी केली असता अन्य तीन सहभागी संशयितांची माहिती दिली. शोध घेऊन अशोक खंडू शेळके, रोहित भरत शेळके (नांदूरशिंगोटे), सलमान नजीर सय्यद (रा. चास) यांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...