आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण कार्यालय:मनमाडला वारंवार वीजपुरवठा खंडित

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि ग्राहकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे मनमाड-येवलारोड येथील ऊर्जा भवन कार्यालयाला टाळे ठाेकण्यात आले व सहायक अभियंता एस. बी. शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

सध्या सर्वत्र गणेशाेत्सव साजरा होत असताना वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्यामुळे ग्राहकांत नाराजी व्यक्त होत आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही व्हावी, सर्वसामान्य ग्राहकांना सवलत देऊन सक्तीने वीजबिल वसुली थांबवावी, ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, सुरळीत वीजपुरवठा मिळावा, वाढीव येणाऱ्या बिलांची प्रकरणे निकाली काढावी व सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी रिपाइं जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, कार्याध्यक्ष गंगाधर त्रिभुवन, पी. आर. निळे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, अॅड. प्रमोद आहिरे, गुरुकुमार निकाळे, सुरेश शिंदे, सुशील खरे, मोजेस साळवे, सुरेश जगताप, प्रदीप घुसळे, शिलास पठारे, प्रशांत दराडे, नाना अहिरे, धनंजय अवचारे, विशाल छाजेड, अकील शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...