आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगोरी:एका चहाच्या ह़ॉटेलवर ;खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित अश्पाक चोग्याला अजमेरमधून अटक

मालेगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी इस्लामपुरा भागात तरुणाचा खून करून फरार झालेल्या संशयितास आयेशानगर पोलिसांनी रविवारी अजमेर शहरातून अटक केली. अश्पाक अहमद रईस अहमद ऊर्फ अश्पाक चोग्या असे संशयिताचे नाव आहे. आपली ओळख लपवून तो एका चहाच्या हॉटेलवर काम करतहोता. अकरा महिन्यांपासून अश्पाक पोलिसांना गुंगारा देतहोता. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून अनिस अहमद सईद अहमद ऊर्फ अनिस अण्णा याची जुलै २०२१ मध्ये निर्घृण हत्या झालीहोती. तीक्ष्ण हत्याराने वार करून अनिसला जीवे ठार मारण्यात आलेहोते. घटनेनंतर पोलिसांनी संशयित मोहंमद रजा रईस अहमद ऊर्फ शेरा, नईम अहमद जमील अहमद, शफिक अहमद व अब्दुल राफे यांना अटक केलीहोती. मुख्य संशयित अश्पाक चोग्या हा फरारहोता.

चोग्या अजमेर शहरात आपली ओळख लपवून वास्तव्य करतहोता. आयेशानगर पोलिस पथकाने अनेकदा अजमेरला जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वेळोवेळी आपली ठिकाणे बदलतहोता. पोलिसांनी चोग्याची माहिती स्थानिक पोलिसांना कळविलीहोती. अजमेर पोलिसांना सुगावा लागताच त्यांनी चोग्याच्या मुसक्या आवळून त्याला आयशानगर पोलिसांच्या स्वाधीन केले. चोग्या सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात काही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या

बातम्या आणखी आहेत...