आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरालगत असलेल्या महादेव मंदिराजवळील गिरणा नदीवर पुलाचे काम होणार आहे. यासाठी कळवण आदिवासी सार्वजनिक विभागाकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन आमदार नितीन पवार याचे हस्ते करण्यात आले. या पुलाच्या कामामुळे ४७ शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल. कळवण, नाकोडा व एकलहरे या तीन गावाचे शिवार असलेल्या कर्दळ परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी किंवा शेतातून कळवणमध्ये येण्यासाठी एकलहरे किंवा नाकोडे गावाकडून तीन ते चार किमी अंतरावरून हेलपाटा मारून जावे लागत होते.
तसेच मळ्यात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना पावसाळ्यात शाळेत जातांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांनाा भाजीपाला सारखे नगदी पिके घेता येत नाही. या पुलामुळे शहरातील रामनगर व कर्दळ शिवार जोडले जाणार आहे. पुलासाठी आमदार नितीन पवार व नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या प्रयत्नाने सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पुलाचे भूमिपूजन आमदार नितीन पवार यांचे हस्ते झाले.
यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, रोहित पगार, प्राचार्य बी. एस पगार, साहेबराव पगार, अतुल पगार, जयेश पगार, नगरसेवक राहुल पगार, राहुल पगार, बळीराम पगार, सुरेश पगार, शंकरराव निकम, साहेबराव निकम, गुलाब निकम, संजय निकम, अशोक निकम, गिरीश पगार आदींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.