आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:पॅरामेडिकल चे विद्यार्थी आरोग्य विभागाचे भविष्य; आमदार नितीन पवार यांचे गाैरवाेद्गार

कळवणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य क्षेत्रातील विविध उपचारांना दिशा देणारे आणि डाॅक्टरांचे कान डोळे बनून काम करणाऱ्या पॅथाॅलाॅजिकल लॅब आणि नर्सिंग क्षेत्राला आज अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पॅरामेडिकल सायन्सेसचे विद्यार्थी आरोग्य विभागाचे भविष्य असल्याचे गौरवोद्गार आमदार नितीन पवार यांनी काढले.भाऊ एज्युकेशनच्या साई पॅरामेडिकल सायन्सेस काॅलेजच्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी तहसीलदार बंडू कापसे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून वकील संघाचे अध्यक्ष संजय पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख आदी उपस्थित होते.तहसीलदार कापसे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शाॅर्टकट न वापरता सखोल अभ्यास करावा. तसेच साई पॅरामेडिकल काॅलेजचे वार्षिक कामकाज प्रशासनाला मदत करणारे व प्रशंसनीय आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

यामध्ये कोरोना काळातील परिस्थितीचे वास्तव दर्शन गाण्यांच्या माध्यमातून मांडून उपस्थितांची वाहवाह मिळवली. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध अडचणी, कर्तव्य व नागरिकांची विचारसरणी आणि आजची परिस्थिती यावर विविध कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक संस्थापक डॉ. दीपक शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी पवार व स्नेहल निकम यांनी केले. रवींद्र बोरसे यांनी आभार मानले.

यावेळी वकील संघाचे सचिव संजय बोरसे, उपनगराध्यक्ष राहूल पगार, रोहित पगार, डॉ. राकेश शेवाळे, डॉ. रवी पाटील, डॉ. धनंजय गांगुर्डे, डॉ. रवींद्र भामरे, सुभाष शेवाळे, लक्ष्मण पगार, राकेश बोरसे, योगेश बोरसे, डॉ. नूतन आहेर, डॉ. पूनम पूरकर, डॉ. अश्विनी खैरनार, निशा शेवाळे, प्राचार्य सुनंदा भोये, प्रा. रेवती ठाकरे, सृष्टी आहेर, कोमल निकम, सुजाता पगार, शीतल पगार, सुजाता मते, विजय जगताप आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...