आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:मालेगावी 3 ठिकाणी गणेशकुंड व्यवस्था

मालेगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यासाठी महापालिकेने शहरात तीन ठिकाणी गणेशकुंडांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक कुंडाच्या ठिकाणी मनपा कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या भविकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमनचे १८ जीवरक्षक तैनात राहणार आहेत.

शुक्रवारी गणेश विसर्जन हाेत आहे. यंदा शहरात ३२० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. यासह घराेघरी हजाराे श्री मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. निर्बंधमुक्त वातावरणामुळे मंडळांचा आकडा वाढला आहे. गणरायाला निराेप देताना मूर्तींचे विधीवत विसर्जन व्हावे यासाठी मनपाने महादेव घाट, कॅम्प तसेच टेहरे चाैफुली गिरणा नदी परिसरात गणेशकुंड तयार केले आहेत. महादेव घाट व कॅम्प येथील कुंड कायमस्वरूपी आहेत. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला महादेव घाट व कॅम्पातील गणेशकुंडांमध्ये स्वच्छ पाणी भरले जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून गणेशभक्तांना मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. महादेव घाट गणेशकुंड परिसरात मनपा, महसूल व पाेलिसांकडून गणेशभक्त व मंडळांचे स्वागत केले जाणार आहे.

काेराेनातून निर्बंधमुक्तीमुळे यंदा कृत्रिम कुंड नाही गेल्या वर्षी काेराेना संक्रमण व गर्दी टाळण्यासाठी मनपाने ९ ठिकाणी कृत्रिम कुंडांची तात्पुरती व्यवस्था केली हाेती. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्तीमुळे एकही कृत्रिम कुंड तयार करण्यात आलेला नाही. नागरिकांना साेयीनुसार तीन ठिकाणी मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. भाविकांनी गणेशकुंडांमध्येच मूर्तींचे विसर्जन करून जलप्रदूषण टाळावे, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...