आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरफोड्या करण्यासह दुचाकीचोरी करणारी टोळी सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मौजमजेसाठी चोरी केली जात होती. चोरीच्या दुचाकी पुणे परिसरात अवघ्या तीन ते चार हजारात विकल्या जात होत्या. चोरट्यांनी नाशिक, उपनगर, नाशिकरोड व नगर जिल्ह्यात घरफोड्या केल्या आहेत. त्यांच्याकडून सात दुचाकी, चार मोबाइल, लॅपटॉप, फ्रीज, दाेन टेबल असा दाेन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे अजून काही घटना उजेडात येऊ शकतील. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचा आदेश केला होता. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक हरीश्चंद्र गोसावी, पोलिस नाईक चेतन मोरे, निवृत्ती गिते, राजेश काकड, गौरव सानप यांच्या पथकाने चोरीच्या घटनांचा वेगाने तपास सुरू केला.
प्रवीण मच्छिंद्र कोकाटे यांनी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार केली होती. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे प्रशांत मोगल काशिद (२३, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), सूरज सोमनाथ धोत्रे (२०, रा. देवीरोड, सिन्नर) व एक विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता शहरातून दुचाकी व शंकरनगर येथे चोरी, नाशिक येथील उपनगर व नाशिकरोड, नगर जिल्ह्यात घरफोड्या केल्याची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.