आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजाची बेकायदेशीरपणे चोरटी विक्री:निफाडला कादवा पुलाजवळ दहा लाखांचा गांजा जप्त

निफाड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कादवा नदीवरील पुलाजवळ एकूण ९ लाख ८१ हजार किमतीचा गांजा पाेलिसांनी पकडला आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार बुधवारी निफाड येथील शांतीनगर त्रिफुलीजवळ कादवा नदीवरील पुलाजवळ स्कॉर्पिओ (एपी २८ डीए ५०६१) या वाहनाची तपासणी केली असता त्यात ९ लाख ८१ हजार किमतीचा १९६ किलो ३३ ग्रॅम गांजा व ४,५०,००० रुपये किमतीची स्कॉर्पिओ, ५५,००० रुपयांचे दोन मोबाइल मिळून आले.

सूरज राम शिंदे (२४, रा. गंगापूररोड, नाशिक) व त्याचा साथीदार अजय संतोष पवार (२४, रा. राणेनगर, सिडको), तुषार भोसले (रा. नाशिक) व त्यांचे इतर साथीदार यांनी संगनमताने गांजाची बेकायदेशीरपणे चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आल्याने यांच्यावर हवालदार सचिन धारपकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...