आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपंचायतीचा‎ लाभार्थींना इशारा‎:9 पर्यंत बांधकाम परवानगी‎ घ्या अन्यथा घरकुल रद्द‎

कळवण‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण नगरपंचायत क्षेत्रात‎ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र‎ बहुसंख्य लाभार्थींनी परवानगी‎ घेऊन बांधकाम चालू केलेले नाही,‎ अशा लाभार्थींनी ९ फेब्रुवारीपर्यंत‎ बांधकाम परवानगी प्रस्ताव सादर‎ करावा अन्यथा त्यांचे घरकुल रद्द‎ करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे‎ सादर करण्याचा इशारा‎ मुख्याधिकारी अविनाश गांगोडे‎ यांनी दिला आहे.‎ प्रधानमंत्री आवास योजनेतील‎ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील‎ १५० लाभार्थींना घरकुल मंजूर केले‎ आहेत. यापैकी ८१ लाभार्थींनी‎ परवानगी घेतली आहे. तर ५४‎ लाभार्थींनी बांधकाम परवानगी‎ घेऊन काम सुरू केले आहे.

काहींचे‎ बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र ६९‎ लाभार्थींनी अजूनही बांधकाम‎ परवानगी घेतलेली नाही. यामुळे‎ सदर योजना मार्च अखेरीस पूर्ण‎ करण्यासाठी प्रशासनाची डोकेदुखी‎ वाढली आहे. पात्र लाभार्थींची यादी‎ नगरपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री‎ आवास योजना कक्षा लावली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असून (प्रकल्प - २) मधील ज्या‎ लाभार्थींनी अद्याप पर्यंत बांधकाम‎ परवानगी घेतली नाही, अशा‎ लाभार्थींनी ९ फेब्रुवारी पर्यंत‎ बांधकाम परवानगी प्रस्ताव सादर‎ करावा अन्यथा घरकुल रद्द‎ करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे‎ सादर करण्याचा इशारा नगरपंचायत‎ प्रशासनाकडून देण्यात आला आहे.‎ परवानगी दिलेल्या परंतु काम सुरू न‎ केलेल्या लाभार्थींनी देखील त्वरित‎ काम सुरू करावे अन्यथा त्याचे‎ देखील नाव लाभार्थी यादीतून‎ वगळले जाईल, असा इशारा देण्यात‎ आला आहे.‎

योजनेला गती मिळेल‎
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत‎पात्र लाभार्थींना‎लाभ मिळावा.‎सर्व लाभार्थींचे‎हक्काचे घर पूर्ण‎व्हावे यासाठी‎प्रशासनाने‎ कडक भूमिका घेतली आहे. योजना‎ मंजूर असल्यावर लाभार्थी लाभ घेत‎ नसतील तर यात शासन आणि‎ लाभार्थी व वंचित लाभार्थी या‎ तिघांचे नुकसान आहे.‎ अविनाश गांगोडे, मुख्याधिकारी‎

बातम्या आणखी आहेत...