आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांद्याला अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गुजरात राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे प्रतिक्विंटल २०० रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर करावे, अशी मागणी येथील भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कांद्याची राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात चालू वर्षी २५ टक्के अधिक लागवडी वाढल्या आहेत. तुलनेत उत्पादन खर्च वाढून उत्पादनात मोठी घट आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत स्थिर होते. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यात दरात घसरण झाल्याने खर्च वसूल करणे अवघड झाले आहे.
या परिस्थितीत गुजरात सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर करावे. हा निर्णय न घेतल्यास भाजप आंदोलन छेडेल. याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल असे निवेदनात म्हटले आहे. नायब तहसीलदार भाऊसाहेब हावळे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे बाबा डमाळे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, नानासाहेब लहरे, संतोष काटे, सुनील सोमसे, महेश पाटील, सुधाकर पाटोळे, संतोष केंद्रे, चेतन धसे, युवराज पाटोळे, दिनेश परदेशी, दत्ता सानप, पांडुरंग शेळके, विनोद बोराडे, सतीश जाधव, दीपक गाढे, राजेश नागपुरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.