आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी:गौर आली ग गौर, सोन्या -रूप्याच्या पावलांनी...

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौरी अर्थात महालक्ष्मीचे शनिवारी शहर व परिसरात घरोघरी विधिवत पारंपरिक गीतांच्या जल्लोषात स्थापना झाली. रविवारी गौरीपूजन आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होईल. आज गौरीची विधिवत स्थापना झाल्यानंतर गौरीपूजन, नैवेद्य, हळदी-कुंकू कार्यक्रम झाले.

‘गौर आली ग गौर, सोन्या -रूप्याच्या पावलांनी’ असा जयघोष, टाळ व घंटानाद करीत मंगलमय वातावरणात गौरींचे आगमन झाले. अनेक घरांत फराळांच्या विविध प्रकारांचे नैवेद्य व गौरीपुढे रोषणाई, सजावट दिसून आली. वेगवेगळ्या दागिन्यांनी व भरजरी साड्यांनी अलंकारासह थाटामाटात गौरी सजविलेल्या दिसल्या. रविवारी गौरीपूजन, नैवेद्य, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर या माहेरवाशिणी सोमवारी पुन्हा आपल्या घरी जातील. त्यांचे विधिवत विसर्जन केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...