आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी संघटनेचे अधीक्षकांना निवेदन:गोदावरी एक्स्प्रेस नियमित सुरू करावी

मनमाड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही २४ वर्षांपासून नियमित धावत असलेली गोदावरी एक्स्प्रेस रेल्वे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे स्थानकाचे स्थानक अधीक्षकांकडे प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री व मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक व लोकप्रतिनिधींना निवेदनात पाठविण्यात अाले आहे. मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस (रेल्वे क्र. १२११७ व १२११८) ही गाडी २४ वर्षांपासून नियमितपणे धावत होती. परंतु कोविड १९ चे कारण दाखवून ती बंद करण्यात आली आहे.

कोविडनंतरच्या काळात रेल्वेने सर्व प्रमुख गाड्या नियमितपणे सुरू केल्या. परंतु गोदावरी एक्स्प्रेस निवेदने देऊनही पूर्ववत सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत उच्च न्यायालयाने २७ जून २०२२ रोजी रेल्वेला गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु रेल्वेने गोदावरीच्या वेळेत मनमाड ते सीएसटी स्पेशल समर ट्रेन सुरू केली आहे.

या गाडीस ६ बोग्या असल्यामुळे मनमाड येथूनच त्या भरून जातात. मनमाड, लासलगाव, निफाड येथून बसणाऱ्या अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो तर अनेकदा गाडीत जागा नसल्यामुळे प्रवाशांना ही गाडी सोडून द्यावी लागते. अनेकदा गाडी पकडण्याच्या प्रयत्नांत अपघातही झालेले आहेत. आता तर रेल्वे प्रशासनाने पुढील दोन महिने ही स्पेशल ट्रेन गुरुवारी रद्द केलेली असून ती सीएसटीऐवजी दादरपर्यंतच केलेली आहे, त्यामुळे चाकरमाने, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, मजूर यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

स्पेशल ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवावी
यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत करावी. ती पूर्ववत होत नाही तोपर्यंत यावेळेत सुटणाऱ्या स्पेशल ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी. ट्रेनमध्ये तिकीट तपासणीसाद्वारा दररोज टीसीची नेमणूक करून चेकिंग करण्यात यावी. दर गुरुवारीही ही गाडी सीएसटीऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत नियमित सुरू ठेवावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...